दिनांक १२ मार्च २०१५ रोजी संस्थेच्या कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता श्री नाथ षष्ठी उत्सवात सौ.वीणा श्रीरंग जोशी यांचे प्रवचन होणार आहे.

 

Pledge

देशस्थ प्रतिज्ञा

     Deshastha Rugvedi Brahmin Sangh is my identity.All Deshasthas are my relatives. I have enticement to all of them. I am proud of their liberality and interest. I will try to devote to all the Deshasthas as well as society. To respect all my elders and Teachers is my responsibility. It is my duty to create goodwill among all the religion and community. I will always keep in mind that what I can give to the society rather than bothering about what society has given to me.

     I will always need your co-operation for the above mentioned pledge to make this is our dream and passion. Deshastha Rugvedi Brahmin Sangh Dombivli will be an ideal and respected institution.

 

Arvind Hastekat

Formar President – Honourable Trustee

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण ही माझी ज्ञाती आहे. सारे देशस्थ माझे आप्तेष्ट आहेत. ह्या आप्तेष्टांबद्दल मला लोभ आहे. देशास्थांचे औदर्य, आपुलकी ह्याचा मला अभिमान आहे. देशस्थांसह सर्व समाजाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या गुरुजनांचा तसेच वडिलधाऱ्यांचा आदर राखणे हा माझा धर्म आहे. सर्व धर्म-पंथात सद्भावनानिर्माण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. मला समाजाने काय दिले ह्यापेक्षा मी समाजाला काय देईन याचे मी सतत भान ठेवेन.

     वरील प्रतिज्ञापूर्तीसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची सर्वतोपरी आवश्यकता आहे.

     वरील विचाराने व आपल्या सहकार्याने देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ,डोंबिवली ही एक आदरणीय व आदर्शयुक्त संस्था ठरावी, ही आपली जिद्द व स्वप्न आहे.


अरविंद हस्तेकर

माजी अध्यक्ष – विद्यमान विश्वस्त

बाणा देशस्थांचा

स्थितप्रज्ञाची लक्षणे जी भगवंताने अर्जुनाला सांगितली “ सुख दु:खे समेकृत्वा,लाभा लाभौ जया जयौ “ या लक्षणात देशस्थ बरोबर समाविष्ट होतात. ते सुखाने हुरळून जाऊन बढाया मारत नाहीत आणि दु:खाने चूर होऊन अगदी गर्तेत ही पडत नाहीत. लाभ झाला तर झाला, जय मिळाला तर मिळाला,नेटाने ते प्रयत्न मात्र करतात. संयम हा गुण यासाठी अंगी असावा लागतो. तो तर देशस्थांच्या रक्तात असतो. बढाया मारणे, शेखी मिरवणे,आम्ही असे आम्ही तसेच्या वल्गना करणे हे त्यांच्या तत्वात बसत नाही. झाकलं माणिक म्हणजे देशस्थ. त्याची प्रभा, त्याच्या गुणांची प्रभा दडवून ठेवली तरी आसमंतात पसरते. संतत्व त्याच्या हृदयात असते म्हणून तर संतांच्या मांदियाळीत देशस्थ अग्रक्रमाने आहेत. उदार अंत:करणाने देत रहाणे, मनाचा मोढेपणा असणे, क्षमाशील असणे, दुसऱ्यांसाठी काही करणे हेच त्याच्या तत्वात बसते. म्हणून देशस्थ हा चारचौघातही उठून दिसतो. त्याचे वेगळे अस्तित्व जाणवत राहत. देशस्थी बाणा असा प्रशस्त असतो.

डॉ. वृंदा कौजलगीकर

Events

नाथ षष्ठी

१२ मार्च २०१५

संध्याकाळी ७ वाजे पासून संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे

more »


दासनवमी उत्सव

13/02/2015 सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत

दासनवमी उत्सव वक्रतुंड हॉल गणेश मंदिर संस्थान ३ रा मजला, येथे सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत संपन्न झाला.

more »


तिळगुळ समारंभ

१६/०१/२०१५ सायं: ६ ते ९ वाजेपर्यंत

वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


जुन्या कपड्यांचे वाटप

नोव्हेंबर २०१३

बेरू मतीमंद प्रतिष्ठान ,बदलापूर

more »


मंगळागौर कार्यशाळा

६ जुलै २०१४

श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


स्नेहसंमेलन

१६ नोव्हेंबर २०१४

द हेरिटेज हॉल, सिटी मॉल जवळ डोंबिवली पूर्व

more »


News

नाथ षष्ठी


दासनवमी उत्सव


श्रावणी समारंभ

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे श्रावणीचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान येथे केले होते. सदरहू उपक्रमासाठी २० नागरिकांनी सहभाग घेतला. बदलापूरहून श्री.कुलकर्णी गुरुजी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी सांगता झाली.