दिनांक १२ मार्च २०१५ रोजी संस्थेच्या कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता श्री नाथ षष्ठी उत्सवात सौ.वीणा श्रीरंग जोशी यांचे प्रवचन होणार आहे.

 

स्नेहसंमेलन

१६ नोव्हेंबर २०१४

द हेरिटेज हॉल, सिटी मॉल जवळ डोंबिवली पूर्व


देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ डोंबिवलीचे स्नेहसंमेलन थाटात साजरे झाले. तारीख होती १६ नोव्हेंबर २०१४ रविवार सकाळी ९ वाजता द हेरिटेज हॉल, सिटी मॉल जवळ डोंबिवली पूर्व येथे. सभासदांची उपस्थिती होत असता सौ.सरोज कलंत्रे व सौ निलीमा चिंचणकर यांच्या स्वागत गीताने स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. वकील श्री श्रीकांत विष्णु जोशी आणि डॉ. सौ.मंदाकिनी अ. काशीकर किंजवडेकर यांचा समेलनाध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभ झाला. वकील श्री श्रीकांत जोशी, डॉ.सौ. मंदाकिनी काशीकर, संस्थेचे अध्यक्ष श्री.दिपक देशपांडे, विश्र्वस्त अध्यक्ष श्री.विनयकुमार काशीकर, कार्यवाह श्री. नारायण रत्नपारखी आणि कोषाध्यक्ष श्री प्रमोद इनामदार या सर्वांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष्यानी संमेलनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

विश्र्वस्त श्री अविनाश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून संस्थेची वाटचाल, कार्यक्रम इत्यादींची माहिती दिली.

यानंतर श्री.चिदंबरम डान्स अकाडमी डोंबिवली यांच्या विविध वयोगटातील कलाकारांनी विविध प्रकारचे व पद्धतीचे १०-१२ नृत्य प्रकार सदर केले व उपस्तीतांचे उत्तम प्रकारे मनोरंजन केले. उपस्तीतांनि उत्स्फूर्तपणे साद देऊन सर्व कलाकारांचे कौतुक केले. हा कार्यक्रम चालू असतांना सभासदांनी थंड पेयाचा स्वाद घेतला.

समेलनाध्यक्ष, प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर स्थानापन्न झाले. पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. अध्यक्ष व पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला.

संमेलनाध्यक्ष्यानी सभासदांस संबोधित करतांना संस्थेने ठोस कार्यक्रम घेऊन सभासदांकडे जावे तसेच डोंबिवलीत विधी महाविद्दयालय स्थापन करण्याची आवश्यकता सांगितली व वाणीचा योग्य उपयोग करावा असे सांगितले.

संस्था अध्यक्षांनी त्यांचे मनोगत सांगताना संस्था नजीकच्या काळात घेत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली तसेचनवीन जागा घेतल्याचे सांगून सभासदांनी सढळ हस्ते देणग्या द्याव्यात असे आवाहन केले.

या नंतर संस्थे तर्फे होणारे मान्यवरांचे सत्कार, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिला समिती तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांचे मानकरी तसेच मनाचे श्र्लोक स्पर्धा यांना पाहुण्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून पुरस्कार देण्यात आले.


युवा मंचातर्फे चालणाऱ्या कार्यक्रमाची माहिती सौ. गिरीजा कलंत्रे यांनी दृक्श्राव्य माध्यमाने करून दिली.

पालक संस्था, दादर, सलंग्न संस्था गिरगाव, ठाणे, मुलुंड, विलेपार्ले येथून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आले. तसेच डोंबिवली शाखे तर्फे कै. श्री. गजानन खिरे किर्लोस्कर वाडी, उत्तम कार्यकर्ता पुरस्कार गिरगाव शाखेचे श्री.मिलिंद कचरे यांना प्रदान करण्यात आला.

सौ. सरोज कलंत्रे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे कार्यवाह श्री. नारायण रत्नपारखी यांनी आभार मानले. उपस्थित असलेल्या एकूण ४९५ सभासदांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. संमेलन दुपारी ३ वाजता संपन्न झाले


आपला,
श्री.नारायण रत्नपारखी

कार्यवाह

छायाचित्रे पहा

Events

नाथ षष्ठी

१२ मार्च २०१५

संध्याकाळी ७ वाजे पासून संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे

more »


दासनवमी उत्सव

13/02/2015 सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत

दासनवमी उत्सव वक्रतुंड हॉल गणेश मंदिर संस्थान ३ रा मजला, येथे सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत संपन्न झाला.

more »


तिळगुळ समारंभ

१६/०१/२०१५ सायं: ६ ते ९ वाजेपर्यंत

वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


जुन्या कपड्यांचे वाटप

नोव्हेंबर २०१३

बेरू मतीमंद प्रतिष्ठान ,बदलापूर

more »


मंगळागौर कार्यशाळा

६ जुलै २०१४

श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


स्नेहसंमेलन

१६ नोव्हेंबर २०१४

द हेरिटेज हॉल, सिटी मॉल जवळ डोंबिवली पूर्व

more »


News

नाथ षष्ठी


दासनवमी उत्सव


श्रावणी समारंभ

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे श्रावणीचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान येथे केले होते. सदरहू उपक्रमासाठी २० नागरिकांनी सहभाग घेतला. बदलापूरहून श्री.कुलकर्णी गुरुजी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी सांगता झाली.