दिनांक १२ मार्च २०१५ रोजी संस्थेच्या कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता श्री नाथ षष्ठी उत्सवात सौ.वीणा श्रीरंग जोशी यांचे प्रवचन होणार आहे.

 

दासनवमी उत्सव

13/02/2015 सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत

दासनवमी उत्सव वक्रतुंड हॉल गणेश मंदिर संस्थान ३ रा मजला, येथे सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत संपन्न झाला.


 

 

जय जय रघुवीर समर्थ

प्रतीवर्षी प्रमाणे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ,डोबीवली, श्री समर्थ सेवा मंडळ-डोंबिवली, ब्राह्मण सभा व डोंबिवलीतील दासबोध मंडळे या सर्वांच्या विद्यमाने २४ वी दासनवमी शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी २०१५ रोजी श्री गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात संपन्न झाली.

सकाळी ६ वाजता काकड आरती व प्रात:स्मरण या कार्यक्रमाने उत्सवास सुरवात झाली. त्यानंतर ७ ते ७ वाजून १५ मिनिटे या वेळात सामुदायिक रामनाम जप घेण्यात आला. बरोबर सकाळी ७ वाजून १५ मिनिटाने कै.सरलाबाई मातोश्री विद्यालयाचे १०० विद्यार्थी तांच्या शिक्षकांसह उपस्थित राहिले. ७ वाजून १५ मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटे या वेळात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे मनाच्या श्र्लोकाचे पठन केले, तेच पुस्तक प्रत्येक विर्द्यार्थ्याला देऊन हे मनाचे श्र्लोक पाठ करण्याबद्दल त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर मनाच्या श्र्लोकाची रचना श्री समर्थ रामदासस्वामी एका रात्रीत कशी केली याबद्दलची कथा श्री श्रीकांत साने यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यान सोबत आलेल्या शिक्षकांना समर्थ प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात आले.

९ ते ९.३० या वेळात समास ४ था चे दासबोध वाचन श्रीमती आशा कुलकर्णी यांनी केले. ९.३० ते ११.३० या वेळात श्री बाळ करंदीकर व त्यांच्या साथीदारांनी बहारदार श्री गीत रामायणातील निवडक गीते सदर केली.

११.३० वाजता श्री समर्थ निर्वाण अध्यायाचे सौ. पद्मजा श्री. कुलकर्णी यांनी वाचन केले. त्यावेळी संपूर्ण सभागृह हेलावून गेले होते. याचवेळी प.पूज्य प्रेमलाताई हसबनीस यांना श्रधांजली अर्पण करण्यात आली.

१२ ते २ या वेळात आरती, रामनाम फेर व महाप्रसादाचे वाटप झाले. दुपारच्या सत्रात २.१५ ते ४ या वेळात भक्तगणांसाठी प्रकट चिंतनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १२ भक्तगणांनी सहभाग घेतला. प्रकटचिंतनाचा विषय होता- दासबोधातील पहिल्या दशकातील कोणताही एक समास, प्रत्येकाने अभ्यासपूर्ण आपले विचार मांडले. याचे समीक्षण केले सौ. पद्मजा श्री. कुलकर्णी यांनी.

दुपारी ४.३० मिनिटांनी श्री विजय गाडगीळ पुणे यांचे प्रवचन झाले. त्यांचा विषय होता  "दासबोधातील सार्वकालिकता".

दासबोध हा प्रत्येक काळासाठी मार्गदर्शक कसा आहे, श्री समर्थांचा उद्देश काय आहे, तो जीवनात कसा उतरेल, जीवनाची व्याख्या काय? इ. प्रश्रांवर त्यांनी सहज साध्य उदाहरणाने प्रकाश टाकला. सच्चिदानंदाची जाणीव झाली पाहिजे त्यासाठी ४ जाणिवांची आवस्यकता आहे. स्वची जाणीव होऊन अनुकूल-प्रतिकूल ओळखता आले पाहिजे, त्यासाठी स्वतंत्र इच्छ्याशक्ती, योग्य वापरासाठी कल्पनाशक्ती व त्याकृतीसाठी विवेक शक्तीची जाणीव असली पाहिजे तरच चारी मुक्ती आपण प्राप्त करू शकतो.

संध्याकाळी ६ ते ६.३० या वेळात सायं उपासना व कल्याणकारी होऊन उत्सवाची सांगता झाली.

संपूर्ण उत्सवाची आखणी व तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे प्रतिनिधी व श्री समर्थ मंडळाचे प्रतिनिधी यांनी उत्तमरित्या सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुराधा मोहिदेकर यांनी केले.

छायाचित्रे पहा

Events

नाथ षष्ठी

१२ मार्च २०१५

संध्याकाळी ७ वाजे पासून संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे

more »


दासनवमी उत्सव

13/02/2015 सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत

दासनवमी उत्सव वक्रतुंड हॉल गणेश मंदिर संस्थान ३ रा मजला, येथे सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत संपन्न झाला.

more »


तिळगुळ समारंभ

१६/०१/२०१५ सायं: ६ ते ९ वाजेपर्यंत

वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


जुन्या कपड्यांचे वाटप

नोव्हेंबर २०१३

बेरू मतीमंद प्रतिष्ठान ,बदलापूर

more »


मंगळागौर कार्यशाळा

६ जुलै २०१४

श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


स्नेहसंमेलन

१६ नोव्हेंबर २०१४

द हेरिटेज हॉल, सिटी मॉल जवळ डोंबिवली पूर्व

more »


News

नाथ षष्ठी


दासनवमी उत्सव


श्रावणी समारंभ

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे श्रावणीचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान येथे केले होते. सदरहू उपक्रमासाठी २० नागरिकांनी सहभाग घेतला. बदलापूरहून श्री.कुलकर्णी गुरुजी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी सांगता झाली.