दिनांक १२ मार्च २०१५ रोजी संस्थेच्या कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता श्री नाथ षष्ठी उत्सवात सौ.वीणा श्रीरंग जोशी यांचे प्रवचन होणार आहे.

 

तिळगुळ समारंभ

१६/०१/२०१५ सायं: ६ ते ९ वाजेपर्यंत

वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली


देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ डोंबिवली या संस्थेचा तिळगुळ समारंभ शुक्रवार दि. १६ जानेवारी २०१५ रोजी श्री गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात संपन्न झाला. या वेळी संस्थेचे ११५ सभासद उपस्थित होते.

महिला विभाग प्रमुख सौ.अनुराधा अ. मोहिदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आजच्या तिळगुळ समारंभासाठी केळकर कॉम्पुटर इनस्टीटयूचे संचालक श्री राजीव वसंत केळकर व MKCL चे ठाणे  जिल्हा केंद्र समन्वयक श्री विलास म्हस्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष मा.श्री दिपक देशपांडे यांनी प्रास्ताविक भाषण करून प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री राजीव केळकर यांनी जेष्ठांसाठी संगणकाचे महत्व व तो कसा हाताळायचा याबाबत स्लाईड शो मार्फत उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या संथेचे दोन सभासद श्री प्रमोद इनामदार (कोषाध्यक्ष) व सौ.अनघा गुळवणी यांनी या संस्थेमार्फत MS-CIT चा कोर्स उत्तम गुणांनी पूर्ण केल्या बद्दल त्यांचे कौतुक केले तसेच या पुढे जे सभासद कॉम्पुटर कोर्सला प्रवेश घेतील त्यांना फी  मध्ये रुपये ५०० ची सवलत जाहीर केली व संस्थेमार्फत चालणाऱ्या कार्यशाळेत सर्वांना भाग घेण्याची विनंती केली.

आभार प्रदर्शनानंतर चहापान, हळदीकुंकू व तिळगुळ वाटपाने समारंभाची सांगता झाली. 

छायाचित्रे

Events

नाथ षष्ठी

१२ मार्च २०१५

संध्याकाळी ७ वाजे पासून संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे

more »


दासनवमी उत्सव

13/02/2015 सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत

दासनवमी उत्सव वक्रतुंड हॉल गणेश मंदिर संस्थान ३ रा मजला, येथे सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत संपन्न झाला.

more »


तिळगुळ समारंभ

१६/०१/२०१५ सायं: ६ ते ९ वाजेपर्यंत

वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


जुन्या कपड्यांचे वाटप

नोव्हेंबर २०१३

बेरू मतीमंद प्रतिष्ठान ,बदलापूर

more »


मंगळागौर कार्यशाळा

६ जुलै २०१४

श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


स्नेहसंमेलन

१६ नोव्हेंबर २०१४

द हेरिटेज हॉल, सिटी मॉल जवळ डोंबिवली पूर्व

more »


News

नाथ षष्ठी


दासनवमी उत्सव


श्रावणी समारंभ

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे श्रावणीचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान येथे केले होते. सदरहू उपक्रमासाठी २० नागरिकांनी सहभाग घेतला. बदलापूरहून श्री.कुलकर्णी गुरुजी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी सांगता झाली.