दिनांक १२ मार्च २०१५ रोजी संस्थेच्या कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता श्री नाथ षष्ठी उत्सवात सौ.वीणा श्रीरंग जोशी यांचे प्रवचन होणार आहे.

 

मंगळागौर कार्यशाळा

६ जुलै २०१४

श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली


आपली  संस्कृती पुढच्या पिढी पर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण युवा संघाने ६ जुलै २०१४ रोजी  वर्क्रतुंड हॉल, गणेश मंदिर येथे एक अनोखी कार्यशाळा आयोजित केली ती म्हणजे मंगळागौरीची. 
 
ह्या कार्यशाळेत ६५ जणींनी भाग घेतला. ह्या कार्यशाळेचे वैशिष्ठ्य असे कि ३ पिढ्यांची उपस्थिती. टिळकनगर विद्यामंदिरच्या विद्यार्थिनी तसेच कॉलेज मधील विद्यार्थिनी, गृहिणी तसेच वृद्ध अश्या सर्व वयोगटातील मुली व स्त्रियांनी सहभाग घेऊन मंगळागौरीचे खेळ एकत्र शिकल्या. 
 
कार्यशाळा आयोजित करण्यासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण संघाच्या सभासद सौ. सरोज कलन्त्रे सौ. संध्या देशपांडे, सौ. मुग्धा जोशी व देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण युवा संघाच्या सभासद सौ. शर्वरी कलन्त्रे ह्यांचे सहकार्य लाभले.त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी कार्यशाळेत रंगत आणली व त्यामुळेच प्रत्येकाला ह्या उपक्रमाचा आनंद लुटता आला.  ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असेले डोंबिवली शहराचे उपमहापौर श्री. राहुल दामले ह्यांनी मंगळागौर कार्यशाळेचे कौतुक केले. 
 
हा उपक्रम देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण युवा संघाच्या वतीने सौ. गिरीजा कलन्त्रे, सौ. कविता लोथे, श्री . जयंत कुलकर्णी, श्री. मंदार कुलकर्णी, श्री.  नीरज देशपांडे ह्यांनी आयोजित केला. तसेच श्री. चिन्मय मडके , सौ. अर्चना जोशी, कु. अक्षता देशपांडे व ऐश्वर्या श्रीवास्त ह्यांचे सहकार्य लाभले.कार्यशाळेच्या आयोजनासाठी युवा संघास देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण जेष्ठ संघाकडून सर्वतोपरी सहकार्य लाभले. 
 

Events

नाथ षष्ठी

१२ मार्च २०१५

संध्याकाळी ७ वाजे पासून संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे

more »


दासनवमी उत्सव

13/02/2015 सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत

दासनवमी उत्सव वक्रतुंड हॉल गणेश मंदिर संस्थान ३ रा मजला, येथे सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत संपन्न झाला.

more »


तिळगुळ समारंभ

१६/०१/२०१५ सायं: ६ ते ९ वाजेपर्यंत

वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


जुन्या कपड्यांचे वाटप

नोव्हेंबर २०१३

बेरू मतीमंद प्रतिष्ठान ,बदलापूर

more »


मंगळागौर कार्यशाळा

६ जुलै २०१४

श्री गणेश मंदिर संस्थान , डोंबिवली

more »


स्नेहसंमेलन

१६ नोव्हेंबर २०१४

द हेरिटेज हॉल, सिटी मॉल जवळ डोंबिवली पूर्व

more »


News

नाथ षष्ठी


दासनवमी उत्सव


श्रावणी समारंभ

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे श्रावणीचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान येथे केले होते. सदरहू उपक्रमासाठी २० नागरिकांनी सहभाग घेतला. बदलापूरहून श्री.कुलकर्णी गुरुजी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी सांगता झाली.